BOX OFFICE- How one interesting thought led Roland Emmerich to create Sci-Fi epic “Moonfall”
What if the moon falls on earth? This single line led one of Hollywood’s most prolific filmmakers to create a ...
Read moreWhat if the moon falls on earth? This single line led one of Hollywood’s most prolific filmmakers to create a ...
Read more“द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड (El Rey de Todo El Mundo) हा प्रसिद्ध चित्रपट निर्माता कार्लोस सौरा यांचा 12 वर्षांच्या कालखंडानंतर काल्पनिक कथाविश्वात पुनरागमन करणारा चित्रपट आहे. या 12 वर्षांमध्ये, सौरा हे संगीतमय माहितीपट बनवत होते, त्यांच्या जिव्हाळ्याच्या संगीताच्या विश्वात रममाण होते. " हे शब्द आहेत द किंग ऑफ ऑल द वर्ल्डचे निर्माते युसेबियो पाचा यांचे, ज्या चित्रपटाने 20-28 नोव्हेंबर 2021 दरम्यान गोव्यात आयोजित 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. युसेबियो पाचा आज 21 नोव्हेंबर 2021 रोजी गोव्यात सहाय्यक निर्मात्या मिर्टा रेनी यांच्यासह पत्रकार परिषदेत बोलत होते. कार्लोस सौरा यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, त्यांच्याच कारमेन (1983) आणि टँगो (1998) या चित्रपटांचा वारसा असलेल्या सांगीतिक त्रयीतील शेवटचा चित्रपट आहे., सांगीतिक माहितीपटांबद्दलच्या त्यांच्या सर्जनशील वेडामुळे ते काल्पनिक चित्रपटांपासून 12 वर्ष दूर राहिले. असे युसेबिओ पाचा यांनी स्पष्ट केले. या चित्रपटातही सौरा यांच्या संगीत आणि नृत्याच्या आवडीने महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सांगत युसेबिओ पाचा म्हणाले : “द किंग ऑफ द वर्ल्डमध्ये, सर्व प्रकारचे संगीत - मग ते लोकसंगीत असो, पारंपारिक असो किंवा आधुनिक - मेक्सिको आणि लॅटिन अमेरिकेचा इतर भागातील संगीत एका जबरदस्त संगीत संगमासाठी एकत्र गुंफले आहे द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’हा चित्रपट, जागतिक चित्रपटविश्वातील या दिग्गज, ज्येष्ठ चित्रकर्मीची सातवी एकत्रित केलेली कलाकृती आहे. ऑस्कर नामांकन प्राप्त दिग्दर्शक कार्लोस सौरा आणि ऑस्कर चित्रपट विजेते छायाचित्रकार, व्हित्तोरियो स्टोरारो, ज्यांना गेल्यावर्षीच्या इफ्फी मध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते, त्यांनी एकत्र येऊन हा चित्रपट तयार केला आहे. उसेबियो पाचा यांनी या दोघांच्या अद्वितीय प्रवासाविषयी आणि त्यांच्यातील सौहार्दा विषयी यावेळी माहिती दिली. “हे दोघे एकमेकांना पूरक आहेत. या दोघांमध्ये स्नेहाचा एक मजबूत बंध आहे, ते एकमेकांना समजून घेतात, एकमेकांना काय हवे आहे, ते या दोघांनाही न सांगताच कळते.” हा चित्रपट अत्यंत सुरेल संगीत, अद्वितीय नृत्याविष्कार आणि चित्तथरारक दृश्यांचा अदभूत असा कोलाज आहे. या चित्रपटात अनेक ठिकाणी सौरा यांची छाप जाणवते. एका ठिकाणी दिग्दर्शकाने काळाची अभिव्यक्ती दर्शवण्यासाठी, हिंसेचा वापर केला आहे. वास्तव आणि कल्पनेचा संगम, भूतकाळाची वर्तमानाशी सांगड घालून अभिव्यक्त होणे, ही खास सौरा यांची शैली या चित्रपटातही दिसते. या चित्रपटात घडत असलेल्या काही घटना कथानकाचा भाग म्हणून येतात, या दृश्यात, हिंसा दुय्यम भूमिकेत आहे, हा चित्रपट राजकीय नाही किंवा, रुपकात्मकही नाही, असे, सहायक निर्माता मित्रा रेंनी यांनी सांगितले. ...
Read moreThe 52nd International Film Festival of India (IFFI) is paying a special tribute to Sir Sean Connery, the first actor to ...
Read moreAs a publication, takshakpost.com will be firmly committed to public interest and democratic values. Apart from providing authoritative analysis and commentary, the aim, as our resources grow, is to build ourselves as a platform driven by good old-fashioned reporting on issues of national and international importance and interest.
Follow Us
All Copyright reserved with pinepine sutra communication Pvt. Ltd.